वाट पाहताना

आता तू येणार नाहीस
माझ्या हाकेला साद देणार नाहीस
मला आता उमजु लागलय

तरी माझ्या मनाला का एक खात्री वाटते
तू परत येशील अशी आपली मैत्री वाटते

वेड्या मनाची समजुत आता कशी मी घालू
तू म्हणालीस पुढच्या मार्गी चाल
पण तूच सांग कसा मी चालू

कारण चालताना आता माझी सावली सोबत नाही
काट्यांचा पायवाट अंधारी रात आणि कुणि साथ नाही
एकच आस उरी कवटाळून जगतोय
तू ये मी तूझी वाट बघतोय..
फक्त तूझीच वाट बघतोय... \




कवी: आत्माराम नाईक

All rights reserved.