निरोप
एक रम्य सकाळ होती
पहाटे उगवणाऱ्या सुयाच्या किरणात
पक्ष्यांनी पसरणाऱ्या निळ्याशार आकाशात
दवबिंदूला न सोडणाऱ्या गवताच्या पतीवर
किनाऱ्याला बिलगणाऱ्या सागराच्या लाटेवर
त्याची ती रम्य सकाळ केव्हा झाली नाही
निरोप घेऊन त्याचा तू परत कधी अली नाही
एक अजब शंका होती
तुला पाहून खुलणाऱ्या काळ्यातून
पाहिलेल्या गालावरील रंगात
प्रतिबिंब पडणाऱ्या नदीच्या पाण्यात
तुला पाहून बेभान होणाऱ्या तरुणाच्या मनात
ती शंका त्याच्या आयुष्यात पुन केव्हा अली नाही
निरोप घेऊन त्याचा तू परत कधी अली नाही
एक कथा सुरु केली होती दैवाने
खरे प्रेम शोधणाऱ्या एका नायकाची
खरे प्रेम शोधणाऱ्या एका नायिकेची
काळ एक होता पण वेळ ना आली सांगण्याची
नंतर कधी चुकून आली जाणीव खऱ्या प्रेमाची
ती अपुर्ण कथा प्रेमाची परत पुर्ण कधी झाली नाही
निरोप घेऊन त्याचा तू परत कधी अली नाही
एक माणूस पाहतोय दररोज मी
स्वतःचा आत्मा हरवलेला
प्रेमावर बहिष्कार टाकलेला
ओलावा हृदयातला सुकलेला
चेहऱ्याचे तेज हरपलेला
तो जीवंत होता की निर्जीव झाला हे कधी त्याला कळले नाही
पण एकच सांगतो बरे झालेकी तू पुन्हा कधी आली नाही