बघ तो जगतोय

जवळ की दूर, मी की तू प्रश्न पुन्हा आहे
काहीही असो, हा अनुभव नवीन नाही, जुना आहे

काळच्या पडद्याआड गेले ते प्रसंग
आता केवळ त्यांच्या पुसटश्या खुणा अहेत

यालच म्हणतात का रे आयुष्य?
जगायचं, बघायचं, उठायचं, बसायचं
की मनाप्रमाणे श्वास घेणं हा सुद्धा गुन्हा आहे

एक नजर तिकडे वळव बघ, कुणीतरी तुझ्यासारखंच
हसतंय, जगतंय, जग अजूनही तसंच बघतंय
तुझ्या लेखी तो मात्र अजूनही उणा आहे




कवी: आत्माराम नाईक

All rights reserved.