आव्हान
येऊ दे लाट
पेटू दे वाट
कडकडू दे विजा
होऊ दे वादळ
राहु दे अढळ
होऊ दे कोप तुझा
मुठ आता वळवली आहे
सारी भिती पळवली आहे
जे होईल ते बघून घेईन
आता पूढे चालत राहीन
एकटा आलो होतो
मग एकटाच का असेना
एक खात्री पुरे झाली
आता कुणि सोबत का नसेना
आता आपली झुंज
त्या नशीब नावाच्या शब्दाशी
धाडस नावाचे शस्त्र हाती
आणि टक्कर प्रारब्धाशी
बस्स आता बस्स झालं
सैताना खेळ संपला तुझा
आता आमची वाट आम्हीच घडवू
सोबत कुणि नसेना दुजा
अरे अडवून तर बघ तूडवून तर बघ
सामान्य माणसाची वाट
जाग आलीय आता त्याला
आता फिरवलीय त्याने पाठ..