असेच काही नकळत
असेच काही नकळत घडले
ध्यानी मनी नसताना
थबकत थबकत हळूच ती आली
माझ्याच मध्ये मी असताना
पावलांची फुले अलगद तिने
माझ्या वाटेवर पसरवली
गोड क्षणांची तृप्त किरणे
माझ्यावर बरसवली
ती आली अशीच कशी
सगळा काही मागे टाकून
माझ्या मनात मावेनाशी
आनंदाची मुठ झाकून