आभाळ फाटलंय

आभाळ फाटलंय, ढग दाटलेत, पाऊस पडतोय मुसळधार
चिंब भिजलोय, सगळ गेलय, प्रक्रुतीने केलाय वार
तरीही आई तुझा हात आभाळासारखा डोक्यावर आहे
कसलीच चिंता नाही आहे आई डोळ्यात ठीणगी खोलवार आहे
आज तुला दीसत असेन दडलेला खोल खोल मी
तरीही आई अवसान माझ अजुनही गळल नाही
शांत आहे मी आई म्हणजे हरलोय नाही
बळ आहे मनगटात अजुनही मी काही घाबरलोय नाही
झोपत नाही म्हणजे कसली चिंता आह अस नाही
जाग आलीय आत्ता आई कसलच भय आता नाही
बघ कसा अजूनही ताठ मी उभा आहे
झोप येत नाही अस नाही मुद्दाम मी जागा आहे
बस आता ठरवलय एकच ध्येय
एकच स्वप्न आणि आयुष्याच एकच प्रमेय
जगायच ठरवलय आई आणि खुप काही बघायच ठरवलय
खूप काही बघायच...




कवी: आत्माराम नाईक

All rights reserved.